व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्याख्यान
व्याख्यान

व्याख्यान

sakal_logo
By

फोटो 
५६८४७
.... . . . . . . . . 
संस्कृती आणि तंत्रज्ञानाची सांगड गरजेची
निखिल पंडितराव : ‘विश्व युवा’ व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प

सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर ता. १६ :  विज्ञानाला भारतीय परंपरा आणि संस्कृतीची जोड दिल्यास जीवन अधिक सुखकर बनेल. खरेतर  वेद - उपनिषद आणि भारतीय  संस्कृतीचे अध्ययन परदेशात होताना  दिसते. मात्र आपण भारतातील लोक अजूनही भौतिकतेच्या मागे लागलेले आहोत. संस्कृतीला अनुसरून विज्ञानाची जोड दिलेली उत्तरे युवा पिढी शोधत आहे. त्यामुळे संस्कृती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून विवेचन करावे,  तरच युवा पिढी हे समजून घेईल. असे प्रतिपादन ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी केले.  
सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि विश्ववर्ती आयुर्वेदिक चिकित्सालयतर्फे आयोजित ‘विश्व युवा’ व्याख्यानमालेतील दुसऱ्या पुष्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे  उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर आणि विश्व युवाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर उपस्थित होते. उद्‌घाटनाच पहिले ऑनलाईन व्याख्यान ॲड. प्रसन्न मालेकर यांचे ‘संस्कृती परंपरा आणि तरुणाई’  या विषयावर झाले.  
विश्वपंढरी येथील आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या सभागृहात झालेल्या उद्घाटन सत्रात बोलताना श्री. पंडितराव पुढे  म्हणाले, ‘नवीन पिढी ध्यान-धारणेवर आधारित विचारसरणीची नाही. साधू-संतांनी उपनिषदांचे विवेचनही त्यांच्या त्यांच्या काळानुसार केले आहे. संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व युवा पिढीला समजावताना शास्त्रीय विज्ञानाचे भाषवर तोललेली उत्तरे असावीत. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘युवा पिढीला दिशा देण्याची  गरज आहे. युवकांची आवड कशात आहे हे जाणून घेतले पाहिजे. हिंदुत्व आणि आयुर्वेद भारताचा सांस्कृतिक पाया आहे, त्याकडे युवकांनी गांभीर्याने पाहावे.’ आनंदनाथ सांगावडेकर यांनी, ‘भारत महासत्ता होत आहे त्यामुळे युवकांनी आत्मपरीक्षण करावे. युवाशक्ती देशाची भवितव्य आहे. त्यांनी देशाच्या भवितव्यासाठी आध्यात्मिक मार्गासोबत विज्ञानाचा मार्गही चोखाळावा, असे सांगितले. पुढील विश्वयुवा व्याख्यानमाला केवळ ऑनलाईन नाही तर हजारो युवकांच्या साक्षीने होईल, असेही त्यांनी सांगितले. ‘विश्वयुवा’चे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांनी मानले.
---------
उद्याचे व्‍याख्यान
उद्या (सोमवारी) खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान होईल.