एनआयई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनआयई
एनआयई

एनआयई

sakal_logo
By

वाचन प्रेरणा दिन
लीड
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शहर, जिल्ह्यात वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन विविध उपक्रमांनी झाला.
--------------
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा ग्रंथपाल भारती जाधव यांनी आढावा घेतला. मुख्याध्यापिका एस. आर. चौगले, उपमुख्याध्यापक व्ही. एन. तलबार, पर्यवेक्षक डी. के. गुरव, पी. एन. सावंत उपस्थित होते. ‘सकाळ’च्या ‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’ या आवृत्तीचे प्रकाशन विद्यार्थिनींच्या आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रुती इनामदार यांनी आभार मानले.
----------------
नागोजीराव पाटणकर स्कूल
कोल्हापूर : येथे वृत्तपत्र विक्रेता दिन, वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अथर्व वायफोळे याने कलाम यांचा वेश परिधान करून परिसरात वृत्तपत्राचे वाटप केले. पर्यवेक्षक पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. साखरे, घनवट उपस्थित होते. ग्रंथपाल पी. बी. जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
-------------
दे. भ. कुंभार हायस्कूल
कंदलगाव : देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महादेव पवार, लेखिका सुप्रा दीक्षित, साधना पाटील, लेखिका मेघा कोल्हटकर, वाचन कट्टा अध्यक्ष युवराज कदम, सुनील मोरे, मुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षिका व्ही. पी. बिर्जे, अभिनव वाचन स्पर्धा समन्वयक सुजाता पाटील उपस्थित होते. या वेळी श्लोक मठ याने मनोगत व्यक्त केले. लेखक आपल्या भेटीअंतर्गत लेखिका सुप्रा दीक्षित यांनी संवाद साधला. वाचन कट्टा उपक्रमांतर्गत ‘विचार गंध’ पुस्तकासंबंधी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. आर. बी. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. जे. बी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा बिर्जे यांनी आभार मानले.
-------------
कंदलगाव विद्यामंदिर
कंदलगाव विद्यामंदिर शाळेत डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळ वृत्तपत्राचे वाटप करण्यात आले. या वेळी वृत्तपत्र विक्रेते नामदेव गोंधळी यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्‍यापक दत्तात्रय देसाई, हिंदूराव परीट, मोहन कोळी, वैशाली कोळी, सविता देसाई, मीना गायकवाड, धनश्री कांबळे, सोनाली गायकवाड उपस्थित होते.
--------------
कागल शहर, परिसर
कागल : येथील डी. आर. माने महाविद्यालयात प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी डॉ. कलाम यांचा जीवन परिचय या विषयावरती मार्गर्शन केले. प्रा. जयश्री जगताप यांनी ''रास'' या आत्मकथनाचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. डॉ. नीला जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनायक खोत यांनी आभार मानले. तंत्र सहायक म्हणून संदीप वाडीकर यांनी काम पाहिले. डॉ. सरस्वती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रा सचिन कांबळे, डॉ. लखन भोगम, प्रा. संगीता डोणे, प्रा. संगीता एकसंबेकर, ॲड. नीता मगदूम उपस्थित होते. यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये कविता वाचन कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक विलास मगदूम यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. कविता वाचन कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल नरेंद्र बोते यांनी केले. सुमारे ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. अशोक घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एकनाथ तोडकर यांनी आभार मानले. संत रोहिदास विद्यामंदिर शाळेत वृत्तपत्र विक्रेते विजय खोडकर, शकील ताशिलदार उपस्थित होते. मुख्याध्यापक शहाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. शकील ताशिलदार यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.