व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्याख्यान
व्याख्यान

व्याख्यान

sakal_logo
By

फोटो ५६८४९ ..
. . . . . . . .

सिद्धांत मांडताना चिकित्सा नाकारू नका

ॲड. प्रसन्न मालेकर : ‘विश्व युवा’ ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

कोल्हापूर ता. १६ : भारतीय संस्कृतीमधील सांगितलेल्या गोष्टींना शास्त्राचा ठाम आधार आहे. ज्ञान प्राप्तीचा खरा मार्ग प्रश्न विचारण्यात असतो. परंतु ही चिकित्सा सद्भावनेची आणि संयमी असावी. शास्त्र म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पुढच्या पिढीला आपण वारसा काय, हे सांगू शकणार नाही. सिद्धांतांची मांडणी करताना चिकित्सा नाकारू नका. संयमाने उत्तर द्या, तरच यातून अमृत बाहेर पडेल, असे मत ॲड. प्रसन्न मालेकर यांनी व्यक्त केले. सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयतर्फे आयोजित ‘विश्व युवा '' ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘संस्कृती परंपरा आणि तरुणाई’ विषयावर ते बोलत होते.
भारतीय सणांचे नैवेद्यापासून ते दुर्वा फुले वाहण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय अनुभूती जोडलेली आहे. ही मांडणी धर्म परंपरेनुसार केलेली असली तरी त्याला शास्त्रीय आधार आहे. हे उदाहरणांसह पटवून देताना गणपतीला दुर्वा असाव्यात, मात्र तुळस वाहायची नाही ही परंपरा आहे. याचे शास्त्रीय कारण म्हणजे या दोन्ही वनस्पती भिन्न प्रवृत्तीच्या आहेत त्यामुळे यांचा वापर करू नये, हा त्यामागचा संकेत आहे प्रत्येक सणावेळी देवाला दिले जाणारे नैवेद्य म्हणजेही त्या त्या ऋतूप्रमाणे आरोग्यदायी खाण्याचे महत्व समजून देण्याचा प्राचीन परंपरेने केलेला शास्त्रशुद्ध प्रयत्न आहे, असेही मालेकर म्हणाले.
शास्त्रीय आधाराचा दाखला देताना त्यांनी लग्नामधल्या ‘हळदी’ विधीमध्ये आज अतिरेक होत असला हळद लावून नवदांपत्याचे एक प्रकारे फेशियल करण्याची कृती शास्त्रीय आचारनुसार परंपरा म्हणून सांगितली गेली. असे सांगितले. आजची पिढी फेशियलसाठी खर्च करत असली तरी हळद लावणे याला शास्त्रीय आधार होता हेच सत्य आहे. आज तरुणाईचा काही वर्ग जशाच्या तसा परंपरा राखण्यात धन्यता मानतो तर दुसरा वर्ग हा परंपरा नाकारतो. यातला खरा रस्ता कोणता असाही प्रश्न पडतो. परंतु भारतीय संस्कृतीत परंपरेने प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. कारण प्रत्येक धर्मग्रंथाचा पहिला अध्याय हा संवादच आहे. आणि प्रश्न आणि उत्तर यातूनच भारतीय परंपरांची उकल झालेली आहे असेही प्रसन्न मालेकर म्हणाले.