सुरेशराव चव्हाण पाटील निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेशराव चव्हाण पाटील निधन
सुरेशराव चव्हाण पाटील निधन

सुरेशराव चव्हाण पाटील निधन

sakal_logo
By

10454
माजी शिक्षक आमदार
सुरेशराव पाटील यांचे निधन
कोल्हापूर, ता. १६ : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षक आमदार सुरेशराव विठ्ठल चव्हाण-पाटील (वय ८२) यांचे बेळगाव येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. उद्या (ता. १७) सकाळी आठ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
श्री. चव्हाण-पाटील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. कोल्हापुरात त्यांचे वास्तव्य नागाळा पार्कात होते. ते विधानसभेचे १९९० ते १९९६ व १९९६ ते २००२ या कालावधीत दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते ज्येष्ठ व आजीव सदस्य होते. डॉ. बापूजी साळुंखे यांच्यासमवेत त्यांनी संस्थेत निष्ठापूर्वक काम केले. संस्थेच्या वाटचालीत त्यांनी योगदान दिले. ते सातारा येथील संस्थेच्या सुशीलादेवी साळुंखे हायस्कूलमधून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले.