पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

पती-पत्नीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा

फ्लॅटचे खरेदी पत्र न केल्याने कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः व्यवहार झालेल्या फ्लॅटचे खरेदीपत्र करून न देता ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश सुधाकर डाके व पत्नी मंजूषा हे याप्रकरणी संशयित आरोप आहेत. सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर यांनी या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत फिर्यादीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलगुटकर यांचे भाऊ संजय कलगुटकर यांना पॉवर ऑफ अॅटर्नी (वटमुख्त्यार) देऊन राजेश डाके व मंजूषा डाके यांच्याकडून रमणमळा येथे एक फ्लॅट खरेदी केला. रमणमळा येथील ‘स्माईल स्टोन’ या अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट खरेदी केला होता. ८ ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी ३० लाख रुपये दिले; मात्र त्याच्या डिक्लेरेशनची प्रत दिली नाही. तसेच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी दिली असतानाही पुन्हा फीची मागणी केली. त्याचसोबत वन टाईम मेंटनन्सच्या नावाखाली १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. २०१६ पासून आजपर्यंत कलगुटकर यांनी राजेश व मंजूषा डाके यांच्याकडे वारंवार मागणी करुनही फ्लॅटचे खरेदीपत्र अद्याप करून दिले नाही. यामुळे कलगुटकर यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.