दुधगंगेत ऊसतोड मजूर गेला वाहून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुधगंगेत ऊसतोड मजूर गेला वाहून
दुधगंगेत ऊसतोड मजूर गेला वाहून

दुधगंगेत ऊसतोड मजूर गेला वाहून

sakal_logo
By

बेळगाव व कोल्हापूर आवृत्तीसाठी

19528
कारदगा : दूधगंगा नदीच्या पात्रामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांचे दिवसभर शोधकार्य सुरू होते.

ऊसतोड मजूर
दूधगंगेत गेला वाहून

कारदगा येथे वसगडेचा एक जण बचावला

कारदगा, ता. १६ : कारदगा-भोज मार्गावर असलेल्या दूधगंगा नदीवरील धरणावरून येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तोल जाऊन पुराच्या पाण्यात दोन ऊसतोड मजूर पडले. त्यात संजय लक्ष्मण राठोड (वय ३५, रा. नरवाड-मराठवाडा महाराष्ट्र) हा वाहून गेला; तर दुसरा एक जण बचावला आहे‌. शुक्रवारी (ता. १४) रात्री ही घटना घडली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. अनिल पाटील (रा. वसगडे ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संजय राठोड व अनिल पाटील व अन्य मजूर भोजहून दुचाकीवरून कारदगाकडे रात्री येत होते. इतर मजुरांच्या दोन दुचाकी पुलावरून पुढे गेल्या; पण संजय राठोड व अनिल पाटील यांना पुलावरील अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने ते सरळ दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेले. यामध्ये अनिल पाटील धाडसाने पुराच्या पाण्यातून पोहून कडेला आले. संजय राठोडचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ जवानांना पाचारण करण्यात आले असून, त्याचा शोध सुरु आहे. त्यामुळे दूधगंगा काठावर नातेवाईक दिवसभर बसून होते.