सीपीआरमध्ये लिफ्ट पडली बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआरमध्ये लिफ्ट पडली बंद
सीपीआरमध्ये लिफ्ट पडली बंद

सीपीआरमध्ये लिफ्ट पडली बंद

sakal_logo
By

सीपीआरच्या लिफ्टमध्ये अडकले डॉक्टर.

वीजपुरवठा खंडित झाल्याने घडला प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः सीपीआरच्या तुळशी इमारतीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने चालती लिफ्ट बंद पडली. त्यामुळे आतमध्ये असणारे डॉक्टर तेथेच अडकले. जनरेटर सुरू केल्यावर लिफ्ट चालू झाली. त्यानंतर डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले; मात्र या प्रकारामुळे सीपीआरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. आज रात्री ८ वाजता ही घटना घडली.
तेथील प्रत्यक्षदक्षींनी सांगितलेल्या माहितीनुसार, सीपीआरमधली तुळशी इमारतीमधील लिफ्ट सुरळीत सुरू होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक डॉक्टर लिफ्टमध्ये गेले. लिफ्ट सुरू झाली, पण अचानक विद्युतपुरवठा बंद झाल्याने लिफ्ट जागीच थांबली आणि आत असणारे डॉक्टर लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर जनरेटर सुरू करण्यात आला. विद्युतपुरवठा सुरू झाल्यावर लिफ्टचे दार उघडले आणि डॉक्टर सुखरूप बाहेर पडले; मात्र त्या पाच ते दहा मिनिटाच्या काळात सगळीकडे गोंधळ उडाला.
------------------------------------
लिफ्टचा बिघाड नेहमीचाच
सीपीआरमध्ये सहा लिफ्ट असून, त्याची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची असते; मात्र ती वेळेवर केली जात नाही. गेल्या अनेक वर्षांत लिफ्टमनची भरतीच झालेली नाही. काही वर्षांपूर्वी लिफ्टचे काम सुरू असताना लिफ्टमध्ये अडकल्याने एका महिलेचा मृत्यूही झाला होता. आज घडलेल्या प्रकारानंतरतरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थितांनी केला.
------------------------------