हक्काबरोबर जबाबदारीची जाणीव हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हक्काबरोबर जबाबदारीची जाणीव हवी
हक्काबरोबर जबाबदारीची जाणीव हवी

हक्काबरोबर जबाबदारीची जाणीव हवी

sakal_logo
By

56891
----------------------------------------------------------------
हक्काबरोबरच जबाबदारीची जाणीव हवी
प्राचार्य डॉ. चौगुले : गडहिंग्लजला ‘रवळनाथ’तर्फे सभासद प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : समाजाच्या सर्वांगीण विकासात सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी, पर्यायाने समाजाच्या विकासासाठी सहकारी संस्थांच्या सभासदांना हक्काबरोबरच कर्तव्य बजावून जबाबदारीचीही जाणीव असायला हवी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी केले.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित सभासद प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या प्रधान कार्यालयात ही कार्यशाळा झाली.
डॉ. महाजन म्हणाले, ‘सहकार चळवळीमुळेच देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेतील स्पर्धेत टिकण्यासाठी सहकारी संस्थांना काळाबरोबर बदलायला हवे. आव्हान पेलण्यासाठी सभासद, संचालक व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणाची गरज आहे. आव्हान पेलणाऱ्या संस्थाच भविष्यात टिकतील.’
एम. एल. चौगुले म्हणाले, ‘सामाजिक बांधिलकी व राजकारण विरहीत कामकाज आणि विविध सामाजिक उपक्रमामुळेच रवळनाथची चौफेर प्रगती झाली आहे. राष्ट्रीय सहकारी संघाच्या सहकार्यातून वेळोवेळी प्रशिक्षण घेतल्याने सभासदांचा सहभाग कामकाजात वाढला आहे.’ अ‍ॅड. सचिन इंजल यांनी कायदा व वसुली याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी विजयकुमार घुगरे, डॉ. संजय चौगुले, डॉ. मनोहर पुजारी, मीना रिगणे, उमा तोरगल्ली, पुष्पा नेसरीकर, सीईओ डी. के. मायदेव, शंकरराव कांबळे, संदीप कागवाडे उपस्थित होते. डॉ. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. बोर्ड सेक्रेटरी सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. निळपणकर यांनी आभार मानले.
-------------------
रवळनाथची सक्सेस स्टोरी
श्री. महाजन म्हणाले, ‘रवळनाथमुळे हजारो घरे उभारली गेली. तरुणांना रोजगार मिळाला. वंचित, गरजू व आपद्‍ग्रस्तांना आधार मिळाला. सहकार चळवळ अडचणीतून जात असताना रवळनाथची प्रगती उंचावतच आहे. त्यामुळे संस्थेची सक्सेस स्टोरी लिहायला हवी.’