गडहिंग्लजला दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धा
गडहिंग्लजला दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धा

गडहिंग्लजला दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धा

sakal_logo
By

गडहिंग्लजला दिवाळीत
दुर्ग बांधणी स्पर्धा
गडहिंग्लज, ता. १७ : दिवाळी सुटीमध्ये लहान मुलांच्या सुप्तगुणांना चालना मिळावी, या हेतूने हिरण्यकेशी फौंडेशन व माझं गडहिंग्लज ग्रुपतर्फे दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. किल्ला बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यासाठी चिमुकल्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धा गडहिंग्लज शहर मर्यादित आहे. किल्ला काल्पनिक नसावा, सिमेंट व प्लास्टिकचा वापर नको, परीक्षणावेळी किल्ल्याचा इतिहास सांगणे अपेक्षित आहे. विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २००० व १००० रुपये रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू दिली जाईल. २५ रुपये प्रवेश शुल्कासह इच्छुकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रशांत बाटे, आदेश विचारे, सुशील देवार्डे, कावेरी चौगुले यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.