हर्षिका वर्टेकरचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षिका वर्टेकरचे यश
हर्षिका वर्टेकरचे यश

हर्षिका वर्टेकरचे यश

sakal_logo
By

GAD173.JPG
हर्षिका वर्टेकर
-----------------------------------------------------
हर्षिका वर्टेकरचा गौरव
नेसरी : मुंबईच्या बालगंधर्व कला अकादमीमार्फत झालेल्या राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील हर्षिका संजय वर्टेकरने विशेष लक्षवेधी अभिनय सादर केल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव झाला. ही स्पर्धा खुल्या गटातील असल्याने प्रथम फेरी ऑनलाईन, तर फायनल ऑफलाईन झाली होती. या राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेसाठी ५२ स्पर्धक पात्र झाले होते. त्यामध्ये हर्षिकाने विशेष लक्षवेधी अभिनयासोबत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. अवघ्या सातव्या वर्षी तिने महाभारतातील द्रौपदी हे पात्र सादर केले होते. यावेळी बालगंधर्व कला अकादमीचे प्रमुख किशोर कुमार, ज्येष्ठ अभिनेत्री शकुंतला नरे, नाट्य निर्माता राजा अत्रे, रंगभूषाकार उलेश खंदारे उपस्थित होते. हर्षिकाचे मूळ गाव हडलगे असून, ती सध्या डोंबिवली येथील ओमकार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दुसरीत शिकत आहे. तिला आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
----------------------------
नाथ पै शाळेत आज दिवाळी मेळावा
गडहिंग्लज : येथील बॅ. नाथ पै विद्यालयात होप फौंडेशनतर्फे दिवाळी मेळाव्याचे आयोजन केले आहे. बिझनेस सायन्स, या विषयांतर्गत हा मेळावा होत आहे. उद्या (ता. १८) सकाळी अकरा ते दुपारी दोन यादरम्यान मेळावा होईल. मेळाव्यात मुलांनी तयार केलेली सुगंधी उटणे, दिवाळी पूजासामग्री, पणत्या यासह कुंभारांनी तयार केलेल्या मातीच्या आकर्षक मूर्ती, आकाश दिवे विक्रीस ठेवले जाणार आहेत. साहित्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी मुलांच्या व शाळेच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
-------------------
दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धा
गडहिंग्लज : दिवाळी सुटीमध्ये लहान मुलांच्या सुप्तगुणांना चालना मिळावी, या हेतूने हिरण्यकेशी फौंडेशन व माझं गडहिंग्लज ग्रुपतर्फे दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. किल्ला बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यासाठी चिमुकल्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा गडहिंग्लज शहर मर्यादित आहे. किल्ला काल्पनिक नसावा, सिमेंट व प्लास्टिकचा वापर नको, परीक्षणावेळी किल्ल्याचा इतिहास सांगणे अपेक्षित आहे. विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २००० व १००० रुपये रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू दिली जाईल. २५ रुपये प्रवेश शुल्कासह इच्छुकांनी ३१ ऑक्टोंबरपूर्वी प्रशांत बाटे, आदेश विचारे, सुशील देवार्डे, कावेरी चौगुले यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.
----------------------------