वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचन प्रेरणा दिन
वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

वाचन प्रेरणा दिन
----------------
सिंबायोसिस स्कूल
गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा दिन झाला. शाळेतील होतकरू विद्यार्थी शिवम पाटील याच्याहस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रंथालय विभाग प्रमुख संतोष आंबी यांनी पुस्तकांचे व वाचनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी वाचनाने वैचारिक प्रगल्भता येत असल्याचे सांगितले. वहिदा मुल्ला, कविता कागीणकर, राजेंद्र शेलार, अतुल अहिरे, अनुपमा देसाई, दिगंबर पाटील, दत्ता गोंधळी, यल्लापा कोळी, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते. रावसाहेब मुरगी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पाटील यांनी आभार मानले.
-----------------------------------
माद्याळ वाचनालय
गडहिंग्लज : माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा केला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिवाजी गवळी यांच्याहस्ते केले. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र आणि पुस्तकांचे वाचन केले. शंकर कोरवी, शंकर केतीकर, सतीश गुरव, आनंद गुरव आदी उपस्थित होते.
-----------------------------
जागृती कनिष्ठ महाविद्यालय
गडहिंग्लज : येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय विभागातर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य विजय चौगुले अध्यक्षस्थानी होते. प्रा. रमेश पाटील यांनी स्वागत केले. अंजुम सूरनाईक, नम्रता पाटील, रमेश घेवडे, सानिका शेंडे, दिक्षा शेंडे या विद्यार्थ्यांनी पुस्तक परिक्षण सादर केले. प्रा. एम. व्ही. पाथरवट यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. उपप्राचार्या अनिता चौगुले, प्रा. स्वाती क्षीरसागर, प्रा. किरण वाघमोडे, प्रा. प्रियांका कदम, प्रा. निंगाप्पा गावडे, प्रा. राजू फुटाणे, प्रा. सरिता भुईंबर, ग्रंथपाल सुशांत घाळी आदी उपस्थित होते. प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुरेश घस्ती यांनी आभार मानले.
---------------------
संत गजानन अभियांत्रिकी महाविद्यालय
महागाव : येथील संत गजानन अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा केला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत होते. डॉ. राजे, ग्रंथालय प्रमुख प्रा. एस. एम. चव्हाण, ग्रंथपाल प्रा. ए. एम. मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. स्थापत्य विभागामार्फत काव्य वाचनाचे आयोजन केले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी कवितांचे वाचन केले.
-----------------------
उत्तूर विद्यालय
उत्तूर ः वाचनाने वाचकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. वाचनामुळे घरबसल्या जगाची सफर करता येते. नियमित वाचन करणारे विद्यार्थी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत रहातात. यासाठी वाचन हा छंद व्हायला हवा, असे प्रतिपादन आर. डी. महापुरे यांनी केले. उत्तूर (ता. आजरा) येथील उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलत होते. प्राचार्य शैलेद्र आमणगी अध्यक्षस्थानी होते. ग्रंथपाल अशोक जाधव यांनी स्वागत केले. प्रा. संजय खोचारे, टी. ए. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
--------------------------
आजरा महाविद्यालय
आजरा ः येथील आजरा महाविद्यालयातील विद्यार्थांशी ज्येष्ठ लेखक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयात डॉ. लवटे यांच्या साहित्यातील निवडक उताऱ्याचे अभिवाचनाचे आयोजन केले होते. भाषा भगिनी मंचच्या द्वारे हा उपक्रम झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे अध्यक्षस्थानी होते. डॉ. सादळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिक पिरापगोळ, प्राजक्ता सुतार, सादिया तकीलदार, सालीम तकीलदार, श्यामल मिसाळ, साद तिकीलदार यांनी निवडक उताऱ्यांचे वाचन केले.
-------------------
भादवण हायस्कूल
भादवण ः भादवण (ता. आजरा) येथील भादवण हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन, जागतिक हात धुवा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात झाला. यानिमित्त हात धुवा प्रात्यक्षिक, वृत्तपत्र वाचन वाचु आनंदे, अवांतर पुस्तक वाचन असे उपक्रम झाले. मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांच्याहस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. मदन देसाई यांनी हात धुवा दिनाची माहिती दिली. व्ही. एच. गवारी यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तन्वी पाटील व ऋणाली पाटील यांनी वृत्तपत्राचे वाचन केले.