गुजरी खड्डा बंद केला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरी खड्डा बंद केला
गुजरी खड्डा बंद केला

गुजरी खड्डा बंद केला

sakal_logo
By

57052

गुजरीतील खोदलेला
खड्डा तातडीने बुजवला

कोल्हापूर, ता. १७ ः पंधरा दिवसांपूर्वी केलेला गुजरीतील रस्ता खोदल्याने टीका झाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज सकाळी तातडीने जाऊन किरकोळ दुरुस्ती करत खड्डा बुजवला. दिवाळीनंतर बाजूपट्टीतून तसेच ब्रेकरच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवण्यात आले.
नवरात्रोत्सवात गुजरीतील रस्ता एका रात्रीत केला होता. त्याला पंधरा दिवसांचा अवधी होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा विभागाने शनिवारी रात्री जेसीबीच्या साहाय्याने त्यावर खोदाई करून मोठा खड्डा खोदला. त्यामुळे ऐन दिवाळीच्या खरेदीच्या कालावधीत नागरिकांना त्रास होत होता. त्याबाबतचे वृत्त आज प्रसिद्ध होताच महापालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली. त्यामुळेच रस्ते चांगले राहत नाहीत, या विविध संघटनांच्या वतीने केला जात असलेला आरोप खरा ठरला. आज सकाळीच जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवले. तेथील गळतीच्या पाईपची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. उर्वरित काम दिवाळीनंतर करण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर खड्डा बुजवण्यात आला. त्यामुळे त्या परिसरातील खोळंबणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. तसेच नागरिकांनाही आता विनाअडथळा चालता येत आहे.