पुस्तके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तके
पुस्तके

पुस्तके

sakal_logo
By

57033
पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रगती सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट देण्यात आले.
.................................

प्रगती सार्वजनिक वाचनालयास
पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ग्रंथदान

कोल्हापूर १७ :- शिरगाव (ता.वाळवा, जि.सांगली) येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयास कोल्हापूर येथील कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ६५ ग्रंथांचे दान करण्यात आले. पवार ट्रस्टचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल ग्रंथदानाचा हा उपक्रम घेण्यात आला.
प्राचार्य डॉ. जे. के. पवार हे दरवर्षी आपल्या वयाएवढी पुस्तके ग्रंथालयांना भेट देतात. वयाची ५० वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांनी या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. गेली १६ वर्षे डॉ.पवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ग्रंथालयांना एक हजाराहून अधिक ग्रंथांचे दान केले आहे. यावर्षी त्यांनी ६५ व्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयास ६५ ग्रंथ भेट दिले. या पुस्तकांमध्ये चरित्र, कथा, कादंबरी, बालवाङ्मय, काव्यसंग्रह आदींचा समावेश आहे.
वाचनालयाचे सल्लागार व कराडचे तहसीलदार विजय पवार, ग्रंथपाल व व्यवस्थापक संदीप पाटील यांनी हे ग्रंथ स्वीकारले. यावेळी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, वाशी येथील श्रीराम उद्योग समूहाचे संस्थापक बी.ए. पाटील, पांडुरंग माळी, चंद्रशेखर पाटील, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, संयोजन विद्यार्थ्यांनीच केले.