घरफाळा कॅम्प सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा कॅम्प सुरू
घरफाळा कॅम्प सुरू

घरफाळा कॅम्प सुरू

sakal_logo
By

57078

विशेष कॅम्पमध्ये आकारला
२२ नवीन इमारतींना घरफाळा

कोल्हापूर, ता. १७ : घरफाळा विभागाने सुरू केलेल्या विशेष कॅम्पमध्ये आज गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत २२ नवीन मिळकतींना घरफाळ्याची आकारणी करण्यात आली. उद्या (ता. १८)छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात कॅम्प घेतला जाणार आहे.
ज्या इमारतींना, खुल्या जागांना अद्यापही घरफाळा आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप आकारणी करून घेतलेली नाही अशा मिळकत धारकांसाठी सर्व विभागीय कार्यालयात कॅम्पचे आयोजन केले आहे. आज गांधी मैदान कार्यालयात कॅम्प घेण्यात आला. नवीन कर आकारणी करण्यासाठी ४ व खुल्या जागेसाठी एका मिळकतधारकाने अर्ज केला होता. त्याप्रमाणे कागदपत्र मागणीबाबत जागेवर नोटीस देऊन पुढील दोन दिवसांत त्यांची कामे निर्गत करण्याचे नियोजन केले आहे. मागील आठवड्यापर्यंत घरफाळा विभागाकडे आलेल्या २२ अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन २२ मिळकतींची कर आकारणी अंतिम केली. सर्वांना नोटीस लागू करून कर आकारणी अंतिम केली. कॅम्पला उपायुक्त शिल्पा दरेकर, कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. कर अधीक्षक प्रताप माने यांनी दिवसभर तक्रारींचे निवारण केले.