दलित वस्‍तीच्या ४० कोटींची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दलित वस्‍तीच्या ४० कोटींची मागणी
दलित वस्‍तीच्या ४० कोटींची मागणी

दलित वस्‍तीच्या ४० कोटींची मागणी

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून....

........
दलित वस्‍ती विकासासाठी ४० कोटींची तरतूद

वंचित वस्‍ती विकासाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १७ : जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाला दलित वस्‍ती विकासासाठी सुमारे ४० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी वंचित वस्‍त्यांना देऊन त्यांचा विकास करण्याचा निर्णय प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी घेतला आहे. याला काही माजी सदस्यांनी विरोध केला होता; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही वंचित वस्‍त्यांना निधी देण्याचा ग्रीन सिग्‍नल दिला असल्याने वंचित वस्‍तीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी समाजकल्याण सहाय्‍यक आयुक्‍त कार्यालयाकडे निधी हस्‍तांतरणाची मागणी केली आहे. दोन दिवसांत हा निधी मिळाल्यानंतर या कामाला गती मिळणार आहे.

समाजकल्याण विभागाकडून दलित वस्‍तीच्या विकासासाठी बृहत आराखडा करण्यात आला आहे; मात्र लोकप्रतिनिधींकडून निधीचे वाटप होत असताना सोयीची भूमिका घेतली जाते. ज्या ठिकाणी मतदान मिळते, अशाच ठिकाणी निधी दिला जातो. एखाद्या गावात विरोधात मतदान गेले तर ते गाव आणि तेथील दलित वस्‍तीच्या विकासाकडे पाठ फिरवली जाते. त्यामुळे पाच वर्षांत एकही रुपया मिळाला नसल्याची तक्रार संबंधित दलित वस्‍तीमधील नागरिकांकडून केली जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी प्रशासक झाल्यानंतर अशा वंचित वस्‍त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला. ज्या वस्‍त्यांना आजपर्यंत एकदाही निधी मिळाला नाही, अशा वस्‍त्यांना प्राधान्‍य देण्याच्या सूचना केल्या.

तालुक्यातून वंचित दलित वस्‍त्यांची यादी तयार करण्यात आली. तालुक्यातील अधिकाऱ्‍यांनी या वस्‍त्यांना भेटी देऊन प्रस्‍ताव सादर केले. तसेच एक वेळ, दोन वेळा निधी मिळालेल्या गावांची यादीही तयार करण्यात आली. या सर्व याद्यांचा विचार करून दलित वस्‍ती विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. काही लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या गावांना निधी न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्‍त केला. विविध स्‍तरावरून हा निधी रद्द करण्यासाठी प्रयत्‍न केले; मात्र पालकमंत्री केसरकर यांना वंचित वस्‍तींचा विकास करण्याची योजना चांगलीच भावली. त्यामुळे त्यांनी समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या याद्या मंजूर करण्याची सूचना केली. या सर्वांची नोंद इतिवृत्तात घेतल्याने या वस्‍तींमधील विकासकामे मार्गी लागणार आहेत.
....