महाद्वार रस्ते सुरू राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाद्वार रस्ते सुरू राहणार
महाद्वार रस्ते सुरू राहणार

महाद्वार रस्ते सुरू राहणार

sakal_logo
By

महाद्वार रोड परिसरातील रस्ते
दिवाळीत वाहतुकीसाठी सुरू

पालिका करणार फेरीवाल्यांवर कारवाई

कोल्हापूर, ता १७ ः नवरात्रीप्रमाणे महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्ते वाहतुकीस सुरू राहणार आहेत. व्यावसायिक, फेरीवाले, दुकानदारांनी आखून दिलेल्या पट्ट्याच्या आत थांबून व्यवसाय करावा. रस्त्याच्या मध्यभागी थांबणाऱ्यांवर फेरीवाल्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दिवाळीसाठी महाद्वार रोड, राजारामपुरी तसेच शहरातील काही बाजाराच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असते. व्यापारी असोसिएशनने महापालिकेला रस्ते बंद करू नयेत, असे निवेदन दिले होते. यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये यावर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरू राहणार असून, कोणत्याही कालावधीमध्ये संपूर्ण रस्ता बंद करण्यात येणार नाही. त्यामुळे या परिसरातील दुकानदार, व्यावसायिक व फेरीवाल्यांना आखून दिलेल्या पांढऱ्या पट्ट्याच्या आत व्यवसाय करावा लागणार आहे. यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित राहून नियमानुसार पट्ट्याच्या आत व्यवसाय करतील, यावर लक्ष ठेवणार आहेत. पट्ट्याच्या आत थांबून वाहतुकीस अडथळा होणार नाही, यानुसार व्यवसाय करायचा असून, मध्यभागी थांबणाऱ्या फेरीवाल्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.