बळीराज महोत्सव साजरा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बळीराज महोत्सव साजरा होणार
बळीराज महोत्सव साजरा होणार

बळीराज महोत्सव साजरा होणार

sakal_logo
By

बळीराजा महोत्सव लोकोत्सव
म्हणून साजरा करणार : पोवार
कोल्हापूर, ता. १७ : बळीराजा महोत्सव हा लोकोत्सव व्हावा, यासाठी या वर्षीचा बळीराजा महोत्सवात कोल्हापुरातील बहुसंख्य लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय शेकाप कार्यालयात झालेल्या बळीराजा महोत्सवाच्या बैठकीत घेण्यात आला.
बळीराजा पुरस्कार, प्रमुख वक्ते तसेच मिरवणुकीबाबत आणखी एक व्यापक बैठक बुधवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता शेकाप कार्यालयात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेश पोवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. दिगंबर लोहार यांनी बैठकीचे स्वागत करून मागील सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ. टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, रविंद्र जाधव, महेश जाधव, राजाराम धनवडे, शफीक देसाई, अभिजित कदम, वैशाली सुर्यवांशी, गीता जाधव, प्रिया जाधव, राहुल सुतार, युवराज पाटील आदींनी मार्गदर्शन केले. दिलीपकुमार जाधव यांनी आभार मानले.