अंधांना करणार स्वंयसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधांना करणार स्वंयसिद्ध
अंधांना करणार स्वंयसिद्ध

अंधांना करणार स्वंयसिद्ध

sakal_logo
By

अंधांना करणार स्वंयसिद्ध
नेत्रदान चळवळीतर्फे कार्यशाळा; 28 व 29 ला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे अंध व्यक्तींसाठी दोनदिवसीय मोफत स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे. मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त या अनिवासी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 28 व 29 ऑक्टोंबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत लक्ष्मी देवालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा होईल. स्वागत थोरात (मुंबई) अंधांना मार्गदर्शन करणार आहेत.
अंध व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचे जगणे सुसह्य व्हावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पांढरी काठी कशी वापरावी, पायऱ्यांची रचना समजून घेऊन पायऱ्या कशा चढायच्या-उतरायच्या, प्रत्यक्ष रस्त्यावर पांढरी काठी घेऊन सुरक्षीतपणे कसे चालायचे, भाज्या-फळे कशा ओळखाव्यात, वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, खाद्यपदार्थ कसे ओळखावेत, आवाजावरुन पक्षी, प्राण्याची ओळख पटविणे, दिशा कशा ओळखाव्यात, स्नायूंची लवचिकता वाढविण्यासाठी व्यायाम प्रकार, इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमपणे वापर कसा करावा यासह दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारची कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेत सहभागी होणारे अंध व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. अंधांना पांढऱ्या काठीचे मोफत वितरण केले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अंधांच्या नातेवाईकांनी सागर पोवार व प्रकाश चोथे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.