यंत्रमाग कामगारांना ३० टक्के बोनस द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंत्रमाग कामगारांना ३० टक्के बोनस द्या
यंत्रमाग कामगारांना ३० टक्के बोनस द्या

यंत्रमाग कामगारांना ३० टक्के बोनस द्या

sakal_logo
By

57194
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले.

यंत्रमाग कामगारांना ३० टक्के बोनस द्या
कृती समितीतर्फे निवेदन; आठ तास कामसह अन्यही मागण्या, आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी, ता. १८ : यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना ३० टक्के बोनस देण्यात यावा, चार तासांचा ओव्हर टाईम पगार, कामगारांना आठ तास काम, हजेरी कार्ड, साप्ताहिक सुटी मिळावी. तसेच कामगार आयुक्त कार्यालयातील कामकाजात सुधारणा करावी. या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी राहुल तोडकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मागण्यांबाबत जलद निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
निवेदनात मजुरीवाढ, ८ तास काम, हजेरी कार्ड, किमान वेतनाची अंमलबजावणी होण्यासाठी २०१३ मध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने इचलकरंजी शहर व परिसरात ४० दिवसांचे तीव्र आंदोलन छेडले होते. या वेळी शहरात शांतता-सुव्यवस्था राहावी म्हणून आजी-माजी आमदार, कामगारमंत्री, जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी, मालक संघटना, कामगार संघटना, अपर कामगार आयुक्त व इतर शासन प्रतिनिधी यांची संयुक्त मीटिंग होऊन यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना मागील वर्षातील दोन महागाई भत्त्याची रक्कम पीस रेटवर रूपांतरित करून द्यावी व प्रत्येक दीपावलीला १६.६६ टक्के बोनस द्यावा, असा करार झाला होता.
त्यामध्ये महागाई भत्त्यानुसार वाढणारी मजुरी सहायक कामगार आयुक्तांनी ३१ डिसेंबरपूर्वी जाहीर करावी, असे ठरले होते. त्याप्रमाणे सुरुवातीचे ५ ते ६ वर्षे मजुरी मिळाली. त्यानंतर वाढीव मजुरी मिळालेली नाही. यंत्रमागमालकांनी कामगार-मालक मजुरीवाढीचा करार मोडीत काढल्याचे जाहीर केले आहे. वाढत्या महागाईमुळे यंत्रमाग धंद्यातील कामगारांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईप्रमाणे बोनस मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.