राजाराम कारखाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम कारखाना
राजाराम कारखाना

राजाराम कारखाना

sakal_logo
By

फोटो-५७२२५
कसबा बावडा ः येथील राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून करताना महादेवराव महाडिक, शेजारी दिलीप पाटील, भगवान पाटील, अमल महाडिक व अन्य.
....................
पाच लाख टनांचे उद्दिष्ट
महादेवराव महाडिक; राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

कसबा बावडा, ता. १८ ः येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामात पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.
‘राजाराम’च्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज श्री. महाडिक यांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून झाला. यावेळी ते बोलत होते. श्री. महाडिक म्हणाले,‘यावर्षी किमान १२.२५ टक्के साखर उताऱ्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व सभासद व तोडणी वाहतूक यंत्रणा आणि कामगारांच्या सहकार्याने ते यशस्वीपणे पूर्ण करू आणि या हंगामातील नोंद असलेला संपूर्ण ऊस मुदतीत गळीत केला जाईल. कारखान्याकडे पुरेशी ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून या वर्षी नवीन ऊस तोडणी मशिन खरेदीसाठीदेखील सहकार्य करणेत आले आहे.’
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष वसंत बेनाडे, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, कार्यलक्षी संचालक शंकर कदम व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत यापूर्वीच संपली आहे. निवडणुकीपूर्वीचा शेवटचा हंगाम असल्याने ऊस दर, नोंद झालेल्या सर्व ऊस गाळप अशी आव्हाने हंगामासमोर आहेत. कारखान्याचे १ हजार ३६९ सभासद उच्च न्यायालयाने अपात्र ठरवले आहेत. याविरोधात सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्या हंगामात जास्तीत जास्त दर देण्याबरोबरच संपूर्ण ऊस गाळपाचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर असेल.