मोदींच्या उपस्थितीत श्रीशैल जगद्गुरुंचा द्वादशा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या उपस्थितीत श्रीशैल जगद्गुरुंचा द्वादशा महोत्सव
मोदींच्या उपस्थितीत श्रीशैल जगद्गुरुंचा द्वादशा महोत्सव

मोदींच्या उपस्थितीत श्रीशैल जगद्गुरुंचा द्वादशा महोत्सव

sakal_logo
By

57224
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोहळ्याचे निमंत्रण देताना श्रीशैलचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य. शेजारी श्री गुरुसिद्धेश्‍वर स्वामी, शांतवीरलिंग शिवाचार्य स्वामी, प्रल्हाद जोशी.

मोदींच्या उपस्थितीत श्रीशैल
जगद्गुरुंचा द्वादशा महोत्सव
श्री गुरुसिद्धेश्‍वर स्वामीजी : जनजागृती मेळाव्याला करणार मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १८ : श्रीशैल महापीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य भागवतपाद यांच्या द्वादशा वर्धंती महोत्सव आणि जन्म सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित जनजागृती मेळाव्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती सोहळ्याचे मुख्य संयोजक व नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी दिली.
नवी दिल्ली येथे मोदी यांची भेट घेवून श्रीशैल पीठाचे जगदगुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, गुरुसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. या वेळी श्री शांतवीरलिंग शिवाचार्य स्वामीजी (औसेकर), केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. 10 ते 15 जानेवारी 2023 या पाच दिवसीय महासंमेलनातील एका दिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून पंतप्रधान मोदी हे निमंत्रण स्वीकारल्याचेही गुरुसिद्धेश्‍वर स्वामींनी सांगितले.
दरम्यान, मोदी यांच्याशी संवाद साधणारे श्रीशैलचे जगद्गुरु म्हणाले, देशातील ज्योतिर्लिंग क्षेत्रांचा विकास होत आहे. ही आनंदाची बाब असून श्रीशैलमध्ये पंतप्रधानांचे आगमन ही सर्वांगीण प्रगतीची नांदी असेल. गुरु सिध्देश्वर स्वामीजी म्हणाले, धर्मप्रसार व राष्ट्र प्रेम वाढीस लागावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी मोदी म्हणाले, देशाच्या अध्यात्मिक विकासासाठी मठ आणि मठाधिशांनी तरुणांना दिशा दाखवावी. या कार्यक्रमास निश्‍चित उपस्थित राहून श्रीशैल पीठाचा आशिर्वाद घेवू.
दरम्यान, श्रीशैल जगद्गुरु सुक्षेत्र यडूर (ता. हुक्केरी) ते श्रीशैल महाक्षेत्र असा 560 कि. मी. चा पायी प्रवास 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 10 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्रीशैलमध्ये प्रथमच अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अधिवेशन होणार आहे. राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वाचन संमेलन, वीरशैव साहित्य संमेलन यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात देशातील लाखो भाविक सहभागी होणार असल्याचेही गुरुसिध्देश्वर स्वामीजींनी सांगितले.