महापालिका कर्मचा-यांना १५ हजार सानुग्रह अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका कर्मचा-यांना १५ हजार सानुग्रह अनुदान
महापालिका कर्मचा-यांना १५ हजार सानुग्रह अनुदान

महापालिका कर्मचा-यांना १५ हजार सानुग्रह अनुदान

sakal_logo
By

महापालिका कर्मचाऱ्यांना
१५ हजार सानुग्रह अनुदान
दोन हजारांची केली वाढ; समितीच्या मागणीला यश
इचलकरंजी, ता. १८ ः महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान आता १५ हजार इतके मिळणार आहे. यापूर्वी प्रशासनाकडून १३ हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र कर्मचारी संघटना कृती समितीने यामध्ये आणखी दोन हजारांची वाढ करण्याची आग्रही मागणी केली. प्रशासक सुधाकर देशमुख यांनी त्याला तत्काळ मंजुरी दिली. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.
दरवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व अग्रीम रक्कम दिली जाते, मात्र यंदा महापालिका झाल्यामुळे व प्रशासक असल्यामुळे याबाबत कोणता निर्णय होणार, याबाबत उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी याबाबतचा आदेश काढला होता. त्यामध्ये १३ हजार रुपये सानुग्रह अनुदान व १२५०० अग्रीम देण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र यातील सानुग्रह अनुदानात आणखी २ हजारांची वाढ करण्याची मागणी आज सर्व कर्मचारी संघटना कृती समितीने प्रशासक देशमुख यांच्याकडे केली.
प्रशासक देशमुख यांनी ही मागणी मान्य करीत यंदा १५ हजार सानुग्रह अनुदान देण्यास सहमती दर्शवली. याबाबतचा सुधारित आदेश उपायुक्त ठेंगल यांनी तातडीने जारी केला. सफाई कर्मचाऱ्यांच्या सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतनही पंधरा दिवसांत देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासक देशमुख यांनी दिले. या निर्णयाबद्दल त्यांचे कृती समितीतर्फे आभार मानण्यात आले. या वेळी ए. बी. पाटील, के. के. कांबळे, शिवाजी जगताप, संपत तांबिरे, सुभाष मालपाणी, धनंजय पळसुले, रवी रजपुते आदी उपस्थित होते.
---------
२३ लाखांचा बोजा वाढणार
सानुग्रह अनुदानात आखणी दोन हजारांची वाढ केल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी व्दिगुणीत होणार आहे; पण यामुळे प्रशासनाला २३ लाखांची आणखी तरतूद करावी लागणार आहे. महापालिकेचे सध्या ११५० इतके कार्यरत कर्मचारी आहेत.
----------
दिवाळीपूर्वी मिळणार वेतन
राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतनही दिवाळीपूर्वी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून हालचाली सुरू होत्या.