Mon, Feb 6, 2023

प्लास्टीक कारवाईत इचलकंरजीत ४० हजार दंड
प्लास्टीक कारवाईत इचलकंरजीत ४० हजार दंड
Published on : 18 October 2022, 1:59 am
प्लास्टीक कारवाईत
इचलकंरजीत ४० हजार दंड
इचलकरंजी, ता.१८ ः येथील महापालिकेच्यावतीने सलग दुसऱ्या दिवशी बंदी असलेल्या प्लास्टीक वापराबद्दल धडक कारवाई केली. आज ८३ किलो प्लास्टीक जप्त केले असून ४० हजार रुपये दंड करण्यात आला. यामध्ये आठ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. अ झोनमध्ये ५ हजार, बी झोनमध्ये १५ हजार रुपये, सी व डी झोनमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये वसूल करण्यात आले. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.