विश्व पंढरी व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्व पंढरी व्याख्यान
विश्व पंढरी व्याख्यान

विश्व पंढरी व्याख्यान

sakal_logo
By

आठवड्यातील एक दिवस सोशल मीडियामुक्त जगा

योगशिक्षिका प्राजक्ता कुलकर्णी

कोल्हापूर, ता. १८ ः ‘तरुणाईचे जीवन सोशल मीडियाने व्यापले आहे. त्याच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या गंभीर आहेत. यातून लहान वयातच बळावणारे मनाचे व शरीराचे आजार सामाजिक चिंतेचे आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पूर्ण सोशल मीडियामुक्त राहण्याचा उपवास करणे आवश्यक आहे. त्याबरोबर शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी ध्यान, योग, सात्विक आहाराला प्राधान्य द्यावे लागेल. त्याची सुरुवात घराघरांतूनच व्हावी, अशी अपेक्षा योगशिक्षिका, समुपदेशक प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
येथील विश्व पंढरी संस्थेने आयोजित केलेल्या विश्व युवा व्याख्यानमालेत कुलकर्णी यांनी ‘ताण-तणाव व्यवस्थापन व योग’ या विषयावर मनोगत मांडले.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘वयाच्या साठीनंतर होणारे मधुमेह, हृदयविकार, पित्त विकार तरुणवयात होत आहेत. त्यासोबत शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात मनाचे विकार बळवत आहेत. गंभीर आजारामागे अनुवंशिकतेबरोबरच बदलती जीवनशैली, जंक फूड अशी कारणे सांगितली जातात. भीती दाटणे, दडपण येणे किंवा शरीर लठ्ठ होण्यापासून ते अन्य गंभीर आजाराची लक्षणे दिसत आहेत. त्याला वेळीच ओळखून दिनचर्येचे (जैविक घड्याळ) महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जेवण, झोप, व्यायामाची गरज हे जैविक घड्याळ सांगत असते तेच ओळखावे लागेल.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘जैविक घड्याळ निसर्गाच्या क्रमानुसार घडत असते. शरीराची पचन संस्था कधी जास्त कार्यक्षम होते तशीच मंद होते. हे निसर्गाने ठरवलेले असते. मात्र, ते समजून न घेता अनेकदा रात्री उशिरापर्यंतचे जागरण, समाजमाध्यमाचा वापर, सकाळी उशिरा उठणे, खाण्यात सात्विकतेचा अभाव, व्यायामाकडे दुर्लक्ष असणे असे दिसते. त्यातून रोग प्रतिकारकशक्ती कमी होते.
...........

प्राजक्ता यांनी दिलेल्या टिप्स अशा


योगनिद्रा ही प्रभावी प्रक्रिया आहे, ती समजून घ्यावी
आंतरिक शक्ती प्रभावी करण्यास संगीत ऐका.
चष्‍मा घालवण्यासाठीही योग उपयुक्त
हृदय तंदुरूस्तीसाठी योग व ध्यान आवश्यक
भावनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायाम करा