Tue, Feb 7, 2023

पाणीपट्टी थकबाकी
पाणीपट्टी थकबाकी
Published on : 18 October 2022, 3:52 am
57306
पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेत
८१ थकबाकीदारांकडून १३ लाख वसूल
कोल्हापूर, ता. १८ ः महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेत दोन दिवसांत ८१ थकबाकीदारांकडून १३ लाख दोन हजार थकबाकी वसूल केली. तसेच ३४ थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे व अधीक्षक प्रशांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे प्रसंग टाळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.