Thur, Feb 2, 2023

नगररचना निवेदन
नगररचना निवेदन
Published on : 18 October 2022, 3:54 am
कारवाईसाठी नागरिकांचा
अधिकाऱ्यांना इशारा
कोल्हापूर, ता. १८ ः शहरातील विविध प्रश्नांबाबत नगररचना विभागास तक्रारी देऊनही कारवाईसाठी खेटे घालणाऱ्या शहरातील नागरिकांनी आता अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निलंबनाची मागणी करण्याचा इशारा दिला आहे.
हेतुपुरस्सर दप्तर दिरंगाई होत असलेल्या नगररचना विभागाविरोधात अनधिकृत बांधकामविरोधी नागरी कृती समिती स्थापन केली आहे. आज सहायक संचालक रामचंद्र महाजन यांना भेटून आठ दिवसांत प्रलंबित कामे निर्गत न झाल्यास विभागप्रमुखांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी लावू, तसेच निलंबनाची मागणी करण्यात येईल, असा इशारा निमंत्रक फिरोझ शेख यांनी निवेदनाद्वारे दिला. प्रा. नीलिमा व्हटकर, अंकुश कदम, चित्रा नार्वेकर, पवन बीडकर, मालती शिंदे आदींचा समावेश होता.