बी. डी. चेचर छायाचित्राला पहिला क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बी. डी. चेचर छायाचित्राला पहिला क्रमांक
बी. डी. चेचर छायाचित्राला पहिला क्रमांक

बी. डी. चेचर छायाचित्राला पहिला क्रमांक

sakal_logo
By

५७३०५
कोल्हापूर ः बी. डी. चेचर यांना त्यांना पारितोषिक देताना पृथ्वीराज महाडिक. शेजारी चारूदत्त जोशी, सुभाष सुर्वे, नागेश हंकारे, अनंत यादव.

‘सकाळ''चे चेचर यांच्या
छायाचित्रास पहिला क्रमांक
कोल्हापूर, ता. १८ ः येथील धनंजय महाडिक युवाशक्ती आणि ‘चॅनल बी’तर्फे झालेल्या यंदाच्या दहीहंडी सोहळ्यांतर्गत छायाचित्र स्पर्धेत ‘सकाळ''चे छायाचित्रकार बी. डी. चेचर यांना पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविले. दरम्यान, छायाचित्र स्पर्धेसह घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके मिळाली.
यंदा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षीही व्यापक स्वरूपात आयोजन केले जाईल, अशी ग्वाही पृथ्वीराज महाडिक यांनी दिली. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत फुलेवाडीच्या शामराव पाटील, म्हाकवेतील अमित पाटील आणि शिवाजी पेठेतील अनुप चौगले यांनी पारितोषिके पटकावली. सचिन गायकवाड, पूनम चव्हाण, सुरज जाधव आणि निशांत पोतदार यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटात डांगे गल्ली तरुण मंडळ आणि शाहूपुरीतील शिवतेज मित्र मंडळाने पारितोषिके पटकावली. दहीहंडी छायाचित्र स्पर्धेत प्रणित चौगले, शरद पाटील यांनाही पारितोषिके मिळाली. यावेळी ‘चॅनलब बी’चे संपादक चारूदत्त जोशी, परीक्षक अनंत यादव आणि नागेश हंकारे, अर्जुन ऑईल रिफायनरीचे व्यवस्थापक सुभाष सुर्वे उपस्थित होते. क्वॉलिटी इंडस्ट्रीजचे अजित चौगुले, शिर्डी टीएमटी बारचे अलोक बन्सल, ऋत्विक बन्सल, वासू बन्सल यांचे आभार मानण्यात आले.