शिक्षण वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण वृत्त
शिक्षण वृत्त

शिक्षण वृत्त

sakal_logo
By

57431 (फोटो ओव्हरसेट)
राजाराम’मध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात ‘प्लास्टिक मुक्त भारत अभियान’ राबवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमारे २५ किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची निर्गत केली. प्राचार्या डॉ. वाय. सी. अत्तार, विभागीय सहासंचालक, डॉ. एच. एन. कटरे यांनी विद्यार्थ्यांना स्वछतेचे महत्त्‍व व प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. एस. ए. सोनवणे, डॉ. व्ही. एम. देशमुख, डॉ. जे. ए. चव्हाण, डॉ. डी. ए. धावणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
---------------
५७४४४ (फोटो रेडी)
कॉमर्स कॉलेजमध्ये रोजगार मेळावा
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे एस. बी. आय लाईफ इन्शुरन्सतर्फे जागर मेळावा झाला. यामध्ये १६० विद्यर्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यामधील ८३ विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. उद्‌घाटन प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे एस. बी. आय लाईफ इन्शुरन्सचे वरिष्ठ अधिकारी रविकुमार जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉलेजचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रोनित आर. खराडे यांनी आभार मानले.
---------------
57455 (फोटो ओव्हरसेट)
लँडस्केप डिझाईन डिस्प्लेचे उद्‍घाटन
कोल्हापूर : सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमन या महाविद्यालयातील बॅचलर्स ऑफ इंटिरियर डिझाईन विभागातर्फे लँडस्केप डिझाईन डिस्प्ले आयोजित केला होता. लँडस्केप डिझायनर वर्षा वायचळ यांनी प्रदर्शनाचे उद्‍घाटन केले. त्या म्हणाल्या, ‘‘कोणत्याही बांधकामाची रचना करताना निसर्ग हा घटक विचारात घेतलाच पाहिजे. पर्यावरण, आरोग्य व आनंद यासाठी तो आवश्यक आहे.’’ प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे, विभागप्रमुख अमर मेस्त्री, सुष्मिता पाटील उपस्थित होते. सायबर संस्थेचे डॉ. आर. ए. शिंदे यांचे सहकार्य लाभले.