समान संधी मंडळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समान संधी मंडळ
समान संधी मंडळ

समान संधी मंडळ

sakal_logo
By

लोगो- शिवाजी विद्यापीठ

समान संधी मंडळात महिला,
अल्पसंख्याक, दिव्यांगांना स्थान

कोल्हापूर, ता. २१ : कोल्हापुरातील युवक अभिषेक मिठारी याच्या सूचनेतून विद्यापीठ अधिनियम सुधारणा विधेयकात ‘समान संधी मंडळ’ आकाराला आले आहे. अल्पसंख्याक, महिला, एलजीबीटीक्यूआयए व दिव्यांगांचा पहिल्यांदाच समावेश झाला असून, विद्यार्थी परिषद वगळता विद्यार्थी प्रतिनिधित्वाचा मंडळात विचार केला आहे.
विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील कायदा उपसमिती शिवाजी विद्यापीठात १४ व १५ डिसेंबर २०२० ला आली होती. अभिषेकने दुर्बल व दुर्लक्षित समाज घटक महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात दुर्लक्षित राहिल्याचे दाखवून दिले होते. त्यांचा विद्यापीठाच्या कोणत्याही कायद्यात उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणले होते. या विधेयकाच्या अनुषंगाने २४ सुधारणा सुचवल्या होत्या. या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार २१ डिसेंबर २०२१ ला राज्याच्या दोन्ही विधिमंडळांत विधेयक पारित झाले व त्यात ‘समान संधी मंडळा’ची तरतूद करण्यात आली.
अभिषेक भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे. तसेच युवक कॉंग्रेसचा प्रवक्ताही आहे.

कोट
विधेयकात काय असावे, याबाबत अभ्यास केला होता. उपेक्षित घटकांना यात स्थान मिळावे, अशी इच्छा होती. त्यानुसार उपसमितीसमोर सूचना केल्या होत्या. त्यांचा समान संधी मंडळात समावेश झाला आहे.
- अभिषेक मिठारी.