दिव्यांग पेन्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग पेन्शन
दिव्यांग पेन्शन

दिव्यांग पेन्शन

sakal_logo
By

मनपा देणार विमा हप्ता रक्कम
दिव्यांगांसाठी मदतीचा हात; सरकारच्या दोन योजनांचा मिळणार लाभ

कोल्हापूर, ता. २१ ः दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या मासिक रकमेबरोबरच महापालिका आता त्यांचा विम्याच्या वार्षिक हप्त्याची रक्कमही देणार आहे. १८ ते ७० वयोगटातील दिव्यांगांना त्याचा लाभ मिळणार असून, शहरात १८०० दिव्यांग विम्यास पात्र होतील. त्यातील काहींचा ४३७ रूपयांचा व काहींचा २० रूपयाचा वार्षिक हप्त्याची रक्कम महापालिका देणार आहे. त्याबाबतचे धोरण निश्‍चित केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन योजनेंतर्गत १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींसाठी विमा योजना राबवली आहे. त्याअंतर्गत दिव्यांगांनीही विमा उतरवला तर त्यांना त्याची वार्षिक हप्त्याची रक्कम भरावी लागत होती. सरकारने निश्‍चित केलेल्या धोरणानुसार महापालिकेकडून दिव्यांगांसाठी मासिक अनुदान दिले जात आहे. त्याची रक्कम प्रतिवर्षी वितरीत केली जाते. महापालिका आता त्यावरच थांबलेली नाही. त्या दिव्यांगांना विम्‍याचाही लाभ देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रशासनाने १८ ते ७० वयोगटातील पात्र ठरणाऱ्या दिव्यांगांची अंदाजित आकडेवारी काढली. सध्या महापालिकेकडे २२०० दिव्यांगाची नोंदणी आहे. त्यातील १८०० पात्र ठरतील असा अंदाज आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षी साडेआठ लाख रूपये लागू शकतात.
बॅंकांमधून सध्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवल्या जात आहेत. अनेक दिव्यांगांचे बॅंकांमध्ये खाते आहे. ज्या बॅंकेत त्यांचे खाते आहे, तिथे त्यांनी विमा उतरावा. त्याची पैसे जमाची पावती दिल्यानंतर महापालिका त्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग करणार आहे. असा प्रस्ताव दरवर्षी केंद्र सरकारच्या योजनेच्या आधीन राहून प तयार केला. त्याची प्रक्रियाही सुरू झाली असून महापालिकेच्या दिव्यांग विभागाकडून विविध संघटनांना त्याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यातून दिव्यांगांच्या खात्याची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

कोट
महापालिकेने दिव्यांगांसाठी म्हणून विम्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली असून, यापुढे विमा योजनेप्रमाणे दरवर्षी त्याच रक्कम दिली जाणार आहे.
-रविकांत आडसूळ, उपायुक्त.
....................
दृष्टिक्षेपात...
महापालिकेकडे नोंद केलेले दिव्यांगः२२००
विम्यासाठी पात्र ठरू शकणारेः१८००
वार्षिक विमा हप्त्याचा अंदाजित खर्चः ८ लाख ५० हजारावर