...तर कचरा पालिकेच्या दारात टाकू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर कचरा पालिकेच्या दारात टाकू
...तर कचरा पालिकेच्या दारात टाकू

...तर कचरा पालिकेच्या दारात टाकू

sakal_logo
By

57844
-------------------
...तर कचरा पालिकेच्या दारात टाकू
‘आप’चा इशारा : निवेदनातून वेधले नगरपरिषदेचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : गडहिंग्लजमध्ये प्रवेश करणार्‍या सर्व रस्त्यांसह शहरात विविध ठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसत आहेत. दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. गटारींची समस्याही आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ यावर कार्यवाही करावी, अन्यथा कचरा पालिकेच्या दारात आणून टाकू असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
याबाबत पालिकेचे अधीक्षक श्‍वेता सुर्वे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अलीकडे शहरात विविध ठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसत आहेत. शहराच्या चोहोबाजूंनी रस्त्याच्या कडेलाच कचर्‍याचे साम्राज्य असून त्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. पावसामुळे कचर्‍याचा चिखल होत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराईची भिती आहे. दोन महिन्यापूर्वी शहरात चिकनगुनिया व डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले. कचरा हटवून स्वच्छता नाही केल्यास पुन्हा ही साथ उद्भवण्याची शक्यता आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पालिकेचा देशपातळीवर क्रमांक आला. परंतु कचर्‍याचे ढिग पाहता पालिकेच्या या यशावर विश्‍वासच बसत नाही. स्वच्छ सर्वेक्षणाच्या फलकाखालीच कचरा दिसत आहे.
पालिका प्रशासनाने शहरातील सर्व कचर्‍याचे ढिग हटवून शहर कचरामुक्त करण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत होईल. हद्दवाढ झाल्याने घंटागाड्यांची संख्या वाढवून कचर्‍याचा उठाव करावा. गटारीतील कचर्‍यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा व गटारींची समस्या प्रशासनाने त्वरीत दूर करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुकाध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष सुमित धाकोजी, कृष्णात कांबळे, दिगंबर पाटील, शिवानंद पाटील, राघवेंद्र कोळी, विनायक फुटाणे, अनिल बिरंजे, रमेश तिकोडे, प्रियांका पाटील आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.