बजाज ऑटोकडून बादशाह बजाज तीन पुरस्कारांनी सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजाज ऑटोकडून बादशाह बजाज तीन पुरस्कारांनी सन्मानित
बजाज ऑटोकडून बादशाह बजाज तीन पुरस्कारांनी सन्मानित

बजाज ऑटोकडून बादशाह बजाज तीन पुरस्कारांनी सन्मानित

sakal_logo
By

1)
57845

बजाज ऑटोकडून बादशाह बजाज तीन पुरस्कारांनी सन्मानित
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, विक्रीपश्चात तत्पर सेवा, विक्री उद्दिष्टपूर्तीनिमित्त बजाज ऑटोकडून बादशाह बजाज यांना तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. बादशाह बजाज पश्चिम महाराष्ट्रातील बजाज मोटारसायकलींचे अगग्रण्य वितरक म्हणून ओळखले जातात. इचलकरंजीतील सांगली रोडवरील बादशाह बजाज शोरूमद्वारे गेली दहा वर्षे ग्राहकांच्या सेवेत आहेत. बजाज ऑटोकडून त्यांच्या वितरकांसाठी वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये यावर्षी बादशाह बजाज यांना सोयीसुविधा, विक्रीपश्चात तत्पर सेवा, विक्री उद्दिष्टपूर्तीनिमित्त तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. असंख्य बजाजप्रेमी ग्राहकांनी बादशाह बजाजवर दाखवलेल्या विश्वासामुळे हा गौरव झाल्याचे बादशाह बजाजचे प्रोप्रायटर इरफान बागवान यांनी सांगितले.
----------
2)
एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशिन फोटो वापरणे

पद्मावती प्राजक्ता इलेक्ट्रॉनिक्स
इचलकरंजीतील विश्‍वासार्ह, ग्राहकाभिमुख आणि उत्तम विक्रीपश्‍चात सेवा देणाऱ्‍या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अग्रगण्य नावात पद्मावती प्राजक्ता इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश होतो. परिसरातील लाखो ग्राहकांना आजपर्यंत सेवा देताना ग्राहकांचे समाधान हेच ध्येय सांभाळले आहे. टीव्ही, फ्रिज, होम अप्लायन्स, ओव्हन, कुलर, एसी, डीप फ्रीज, चक्की, किचनमधील चिमणी अशा अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे ठिकाण म्हणून पद्मावती प्राजक्ता इलेक्ट्रॉनिक्सचा लौकीक आहे. एका छोट्याशा शोरूममधून सुरू झालेला हा व्यवसाय आज प्रचंड विस्तारला आहे. आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याची असणारी गरज येथे पूर्ण होते. लॉयड, व्हर्लपूल, सोनी, सॅमसंग, आयएफबी, एलजी अशा नामांकीत कंपन्यांचे फ्रिज, एलईडी, वॉशिंग मशिन, एसी, मायक्रोओव्हन, वॉटर प्युरिफायर व इतर सर्व उत्पादने येथे उपलब्ध आहेत. दिवाळीनिमित्त विविध ग्राहकाभिमुख योजना आणि सवलतीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती प्रोप्रायटर राजेंद्र खूळ यांनी दिली.
पत्ता ः पद्मावती प्राजक्ता इलेक्ट्रॉनिक्स, शाहू पुतळा, इचलकरंजी.
--------------
3)
57846

सुवर्णमहोत्सवी चौगुले स्वीट मार्ट...
‘अभय’ उत्पादनांची यशस्वी वाटचाल

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन क्षेत्रात १९७० पासून कार्यरत असणाऱ्या चौगुले स्वीट मार्ट-चौगुले डेअरी प्रॉडक्टसने दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबरच आता ‘अभय’ बेकरी उत्पादनांची सुरवात केली आहे. ब्रेड, खारी, टोस्ट, सँडविच ब्रेड आदी दर्जेदार बेकरी उत्पादने सुरू केली आहेत. इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलजवळ चौगुले स्वीट मार्टमध्ये विविध प्रकारांतील दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रशस्त, आधुनिक व संगणकीकृत काऊंटरची व्यवस्था केली आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विविध प्रकारांतील फ्लेवरचे श्रीखंड तसेच रबडी बासुंदी, सिताफळ रबडी, आंबा रबडी, अंजीर रबडी, राजस्थानी रबडी, मँगो लस्सी, पुदीना लस्सी, मलई लस्सी उपलब्ध आहे. दुग्धजन्य पदार्थ विक्रीतील प्रदीर्घ अनुभव, दर्जेदार पदार्थ आणि उत्कृष्ट सेवा यामुळे अनेक ग्राहक आज चौगुले डेअरी समूहाशी जोडले गेले आहेत. अभय उत्पादने या ब्रँड नावाने उपलब्ध असलेली सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली असून दिवसेंदिवस ग्राहकांची मागणी वाढत आहे.
------------
4) 57869

अचिंत्य आयुर्वेद एवं पंचकर्म चिकित्सालय
पंचकर्मची गौरवशाली परंपरा

शरीरातील विकृत दोष शरीरबाह्य होणे, शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे व ग्रंथीचे कार्य व्यवस्थितरित्या सुरू ठेवणे, स्वस्थ व्यक्तीची शारीरिक क्षमता वाढवणे व व्याधिक्षमत्व वाढवणे, शरीराची ओज शक्ती (प्राणशक्ती) वाढवणे, वयोमानानुसार शरीरात घडणारे बदल सुरळीतरित्या घडवणे, मानसिक स्वास्थ्य सुधारणे, शरीरातील सर्व स्नायू व मज्जातंतूंना बळ देणे, शरीरातील अनावश्यक क्लेद शरीराबाहेर विसर्जित करणे, वयोमानानुसार होणाऱ्या विकृतीचा म्हणजे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, संधीवात, मणक्यांचे विकार, हाडामधील झीज कमी करणे, वजन कमी करणे, स्थूलपणा कमी करणे, पौरुष शक्ती वाढवणे या गोष्टी असून शुक्र धातुमधील विकृती नाश केल्या जातात.
वैद्य सचिन झाडबुके आणि वैद्य सौ. चंद्रलेखा झाडबुके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्यदायी सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये केरळीय पंचकर्मासाठी स्त्री व पुरुष असे स्वतंत्र सुसज्ज पंचकर्म थेरपी विभाग, शास्त्रशुद्ध आयुर्वेद औषध निर्माण विभाग, आयुर्वेदिक औषध विभाग, स्वतंत्र अ‍ॅडमिट विभाग, धन्वंतरी ध्यान व योगा कक्ष, प्रशिक्षित सेवक, अद्ययावत नाडी परीक्षा-रुग्णांची नाडी परीक्षा करून आधुनिक वैद्यकीय आयुर्वेदानुसार अचूक निदान केले जाते.
पत्ता ः अचिंत्य आयुर्वेद एवं पंचकर्म चिकित्सालय, नदीवेस, रामजानकी हॉलसमोर, राम अपार्टमेंट, इचलकरंजी.