इचल: निवड आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: निवड आवश्यक
इचल: निवड आवश्यक

इचल: निवड आवश्यक

sakal_logo
By

57938
.........

लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसच्या चेअरमनपदी फाटक
इचलकरंजी, ता. २१ ः येथील दि लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसच्या चेअरमनपदी मुकुंद फाटक यांची, तर व्हाईस चेअरमनपदी राजाराम लोकरे यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी पार पडल्या. हातकणंगले उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी एम. जी. शिंदे अध्यक्षस्थानी होते. फाटक यांचे नाव सतीश बुरसे यांनी सुचविले. त्यास नीळकंठ गोरे यांनी अनुमोदन दिले. लोकरे यांचे नाव उमेश कुलकर्णी यांनी सुचविले. याला अनंत लोले यांनी अनुमोदन दिले. यामुळे मारुती कुंभार, यशवंत शिंदे, विजय सदामते, महादेव बडवे, मंजूषा वरुटे, सुवर्णा कानडे यांच्यासह व्यवस्थापक मधुकर पाटील उपस्थित होते.