रस्ता काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता काम सुरू
रस्ता काम सुरू

रस्ता काम सुरू

sakal_logo
By

फोटो- 57960
.....

तात्पुरती मलमपट्टी सुरू

कोल्हापूर-सांगली रस्ता; ‘सकाळ’चा दणका, कायमस्‍वरूपी तोडगा हवा
.............
कोल्हापूर, ता. २१ ः गेले अनेक दिवस खड्डे व खाचखळग्यांनी भरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम आजपासून भारतीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले. तीन दिवसांपासून ‘सकाळ’मधून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबतची मालिका सुरू आहे. या वृत्ताची दखल घेऊन आज हे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान, ही दुरुस्ती म्हणजे तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी हा रस्ता चांगला राहावा, तो खचू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. नागपूर-रत्नागिरी या आशियाई मार्गांतर्गत कोल्हापूर-सांगली रस्त्याचा समावेश होतो. मिरजेपासून पुढे सोलापूरपर्यंत हा रस्ता अतिशय चांगला आहे. पण, कोल्हापूर ते सांगली मार्ग मात्र मृत्यूचा सापळा बनला. फक्त सांगली फाटा ते हातकणंगले या २३ किलोमीटरच्या रस्त्यावर एक हजार ७५ मोठे खड्डे होते. गेल्या आठवड्यात या मार्गावर एक मोठा खड्डा पडल्याने वाहतूक खोळंबली होती. या वाहतूक कोंडीत ‘ओक्के’फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे तब्बल दोन तास अडकून पडले होते.
गेली अनेक वर्षे खराब झालेल्या या रस्त्याकडे ‘सकाळ’ने मालिकेच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गेले तीन दिवस सुरू असलेल्या बातम्यांची दखल घेऊन आजपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ज्याठिकाणी खड्डे पडले आहेत, ते भरून घेण्याबरोबरच रस्ता उखडलेल्या ठिकाणी डांबरीकरण सुरू केले. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. पण, त्यानंतर या मार्गावर खड्डे पडणार नाहीत याची खबरदारी या विभागाने घेण्याची गरज आहे.
..........