जयप्रभा स्टुडिओ- संभाजीराजे ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयप्रभा स्टुडिओ- संभाजीराजे ट्विट
जयप्रभा स्टुडिओ- संभाजीराजे ट्विट

जयप्रभा स्टुडिओ- संभाजीराजे ट्विट

sakal_logo
By

शासनाने लक्ष घालावेःसंभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर, ता. २१ ः जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशा आशयाची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर केली.
स्टुडिओ वाचविण्यासाठी काही आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापूरात रोवली गेली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट सृष्टीस उत्तेजन देण्यासाठी स्टुडिओ सुरू केला. सध्या जयप्रभा स्टुडिओ या नावाने ओळखला जाणारा हा स्टुडिओ नंतरच्या काळात महाराजांनी केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरण्याच्या अटीवर प्रसिद्ध चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपविला. कलानगरीचा कणा असणारा हा ऐतिहासिक स्टुडिओ अलिकडच्या काळात विकसकाच्या घशात घातला जात आहे. यामुळे स्टुडिओचे अस्तित्व संपत चालले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, असेही त्यांनी म्हंटले आहे.