आत्मनर्भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मनर्भर
आत्मनर्भर

आत्मनर्भर

sakal_logo
By

पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर
निधी योजनेत महापालिका अव्वल
कोल्हापूर, ता. २१ : पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत सर्वाधिक कर्ज वितरणात महापालिका राज्यात अव्वल आली. शुक्रवारी (ता. २१) प्रधान सचिवांनी कामाचे कौतुक केले.
कोरोना कालावधीत आर्थिक अडचणीतील फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना केंद्र सरकारने सुरू केली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेने दोन वर्षांत सात हजार २३१ लाभार्थ्यांना नऊ कोटी १२ लाख रुपये कर्ज वितरित केले. फेरीवाल्यांचे कर्जासाठी सात हजार ८५८ अर्ज आले. कर्ज मंजूर झालेले फेरीवाले सात हजार ४९० आहेत. पैकी सात हजार २३१ फेरीवाल्यांना कर्ज वितरण झाले. दहा हजार कर्ज घेतलेले लाभार्थी पाच हजार ३७५ आहेत; तर २० हजार कर्ज घेतलेले लाभार्थी एक हजार ८३६ व ५० हजार कर्ज घेतलेले २० आहेत.
कोरोनात व्यवसायावर परिणाम झाला होता. उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न होता. निर्बंध शिथिल झाल्यावर भांडवल नसल्याने त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे मोठे आव्हान होते. या योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला. मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना सात टक्के व्याज अनुदान दिले जाते. व्याज अनुदानाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात प्रत्येक तीन महिन्यांनी जमा केली जाते. डिजिटल व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना एक हजार २०० पर्यंतची कॅशबॅक सुविधा दिली आहे.