कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

58002

‘दालमिया’तर्फे संगणकाचे
विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
पोर्ले तर्फ ठाणे ः कन्या विद्यामंदिर केर्ले येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्गांचा प्रारंभ दालमिया भारत फाउंडेशन आणि दालमिया भारत शुगर्स लि. आसुर्ले-पोर्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा प्रसाद यांच्या हस्ते झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान मिळावे, मुले संगणक साक्षर व्हावीत हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी सुनील कुंभार होते. संगणक प्रशिक्षण पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन महिने मोफत सुरू राहणार आहे. संगणक व्हॅन केर्लेत आणण्यासाठी नितीन कुरळुपे यांनी विशेष सहकार्य केले आहे. रंगा प्रसाद, गोसावी, नितीन कुरळुपे, प्रशिक्षक अभिजित, सरपंच उषा माने, सुनील कुंभार, जालिंदर कुंभार, अनील शेलार उपस्थित होत्या. दीपक जगदाळे यांनी स्वागत केले. कृष्णात कारंडे यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी गवळी हिने आभार मानले. कन्या विद्या मंदिर केर्लेच्या शिक्षक आणि विद्यार्थिनींनी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.