कोवाड-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-क्राईम
कोवाड-क्राईम

कोवाड-क्राईम

sakal_logo
By

कालकुंद्रीतील महिलेच्या मृत्यूबाबत तपास सुरूच

कोवाड, ता. २१ ः कालकुंद्री (ता. चंदगड) येथे बुधवारी रात्री घराशेजारील शेतात नंदा नामदेव जोशी या महिलेचा मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. संशयास्पद झालेल्या मृत्यूमुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. तासभरापूर्वी बाहेरगावाहून आलेल्या नंदा जोशी यांचा अचानक घराशेजारच्या शेतात मृतदेह सापडतो आणि मुलगा, तो मृत्यू नसून आईचा गळा आवळून ठार मारल्याची पोलिसांत तक्रार देतो. यावरून या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. चंदगड पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे. नंदा जोशी यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा असल्याने सर्वांचे डोळे पोलिस तपासाकडे लागले आहेत. मृत जोशी यांचा मुलगा भरमू यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून घातपाताचा संशय बळावला असल्याने पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप तशा प्रकारची कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.