मिस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन
मिस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन

मिस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

‘निवी क्रिएशन’तर्फे विविध स्पर्धांचे
१३ नोव्हेंबरला आयोजन : समता वाकडे

कोल्हापूर : निवी क्रिएशन कंपनीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ‘ग्लॅमेटोर’ नावाने मिस्टर महाराष्ट्र, मिस महाराष्ट्र, मिसेस महाराष्ट्र अशा स्पर्धा १३ नोव्हेंबरला होतील, अशी माहिती संयोजिका समता वाकडे, दीप्ती वाकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समता म्हणाल्या, ‘आम्ही आमच्या उद्योगात ४० दिव्यांगांना कामाची संधी दिली आहे. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवत असतो. निवी क्रिएशनद्वारे सौंदर्यविषयक स्पर्धांचे १० वर्षांपासून आयोजन करत आहोत. पुणे-मुंबई नंतर आता कोल्हापुरात ‘ग्लॅमेटोर’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सयाजी हॉटेलमध्ये होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोल्हापुरातील उमेदवारांनी ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत संस्थेच्या मोबाईलवर किंवा वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. निवड झालेल्या स्पर्धकांना मुंबईच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून तीन दिवसांचं प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांना स्पर्धेत सहभागी केले जाईल. स्पर्धेदिवशी १० दिव्यांग मुलंही रॅम्पवॉक करणार आहेत. अभिनेते मिलिंद गुणाजी, सोनिया मायर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.’ यावेळी कुलदीप पवार, तेजस्विनी पवार, पूजा कांबळे आदी उपस्थित होते.