आजरा ः गव्याला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः गव्याला जीवदान
आजरा ः गव्याला जीवदान

आजरा ः गव्याला जीवदान

sakal_logo
By

58031
भावेवाडी ः येथील विहिरीत पडलेला गवा.
....................

भावेवाडीत विहिरीत पडलेल्या
अंध गव्याला जीवदान
आजरा, ता. २१ ः भावेवाडी (ता. आजरा) येथे विहिरीत पडलेल्या गव्याला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान दिले. तो चंदगडच्या दिशेने जंगलात गेला. हा गवा अंध असल्याने विहिरीत पडल्याचे वन विभागाचे दक्षिण आजराचे वनपाल एस. के. नीळकंठ यांनी सांगितले. या गव्याचा उजवा डोळा पूर्ण निकामी झाला आहे. पाच- सहा दिवसांपासून तो परिसरात फिरत होता. त्याचे वय अंदाजे आठ ते नऊ वर्ष आहे. वन विभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढले. हा गवा भावेवाडी मराठी शाळेकडे गेला. त्याच दरम्यान एक महिला पतीला गव्याच्या घटनेबदल माहिती देण्यासाठी शेताकडे चालली होती. ती हाका मारताना गवा तिच्यापाठोपाठ आवाजाच्या दिशेने गेला. तिने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गव्याला दिसत नसल्याने तो आवाजाच्या दिशेने जात असून शेताकडे जाताना ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली.