नगररचना महसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचना महसूल
नगररचना महसूल

नगररचना महसूल

sakal_logo
By

‘नगररचना’चा महसूल
८ कोटी ८८ लाखांवर

कोल्हापूर, ता. २१ ः महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी कॅम्प तसेच विविध मोहीम हाती घेतल्या आहेत. नगररचना विभागाने घेतलेल्या कॅम्पमुळे ऑक्टोबरमध्ये ८ कोटी ८८ लाखांचा महसूल जमा झाला असून, या विभागाचे आतापर्यंतचा महसूल ३१ कोटी ७६ लाख झाला आहे. नगररचना विभागाने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सातत्याने कॅम्प घेतले आहेत. तसेच आता बांधकाम परवानगीचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात आहेत. त्यापूर्वी ऑफलाईन सुरू असताना मोठ्या संख्येने अर्ज आले होते. ८३० प्रकरणे ऑफलाईन सादर झाली होती. त्यातील ७१६ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत या विभागाचा २२ कोटी ८८ लाखांचा महसूल जमा झाला होता. ऑक्टोबरमध्ये त्यात ८ कोटी ८८ लाखांची भर पडल्याने आतापर्यंतच्या महसुलाचा आकडा ३१ कोटी ७६ लाखांवर पोहचला.