पाउस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाउस
पाउस

पाउस

sakal_logo
By

शहर परिसरात पावसाचे थैमान
कोल्हापूर, ता. २१ : शहर व परिसरात ढगफुटीसदृश पावसाने आणि जोरदार विजांच्या कडकडाटाने थैमान घातले. शहरासह उपनगरातील रस्त्यांवर ओढ्यांप्रमाणे पाणी वाहिले. त्यामुळे रात्री उशिरा घरी येणाऱ्या लोकांची भीतीने गाळण उडाली.
जिल्ह्यात सकाळपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले; तर अधूनमधून सूर्यदर्शन झाले. दरम्यान, रात्री साडेदहानंतर विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवाळीनिमित्त रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली विविध साहित्यांची दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांना धावपळ करावी लागली. पानलाइन तसेच महाद्वार रोडवरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेला किरकोळ मालही भिजल्याने नुकसान झाले. तब्बल एक तास झालेल्या पावसामुळे शहरात पाणी-पाणी केले.
पाऊस उघडल्याचे पाहून अनेकांनी सोयाबीन मळणीचे काम हाती घेतले होते. तसेच, काही सोयाबीन शेतात तसेच ठेवल्याने या सोयाबीनला फटका बसला आहे. उद्या (ता. २२) शेतात गेल्यावरच या पिकाची अवस्था पाहायला मिळेल. एक तासाच्या पावसानंतर रात्री बारानंतर पावसाची रिमझिम सुरू राहिली. यातच मोठ्या आवाजातील विजांच्या कडकडाटाने लोकांच्या मनात भीती निर्माण केली.