ओलम कारखान्यातर्फे ३००८ रुपये दर जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओलम कारखान्यातर्फे ३००८ रुपये दर जाहीर
ओलम कारखान्यातर्फे ३००८ रुपये दर जाहीर

ओलम कारखान्यातर्फे ३००८ रुपये दर जाहीर

sakal_logo
By

58050
भरत कुंडल
-------------

ओलम कारखान्यातर्फे
३००८ रु. दर जाहीर
कोवाड, ता. २२ : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार आठ रुपये ऊस दर जाहीर करण्यात आला. चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तीन तालुक्यांत ओलमचा ऊसदर सर्वात जास्त असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी यंदा पेटली आहेत. परंतु; अतिवृष्टीमुळे ऊसतोड कशी करायची, याचे संकट निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत हंगाम तेजीत सुरू होईल. तत्पूर्वी ऊस दराकडे सर्वांचे लक्ष होते. त्याअनुषंगाने कारखान्याचे बिझनेस हेड कुंडल यांनी गुरुवारी ऊस दर जाहीर करुन गळीत हंगामाला सुरवात केली. यावेळी कुंडल म्हणाले, ‘‘चालू वर्षी आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. शेतकरी, कामगार, तोडणी मजूर व वाहतूकदारांच्या सहकार्याने नक्की पूर्ण करू, असा विश्वास आहे. पुढील दोन वर्षांत ओलम १० लाख टन उसाचे गाळप करेल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढावे यावर कारखाना प्रशासन काम करत आहे. कारखान्याचे विस्तारीकरण, वाढीव गाळप क्षमता व शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा विचारात घेऊन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त उसाचा पुरवठा करावा, असे आवाहन कुंडल यांनी केले.