अडीच लाखांची दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच लाखांची दारु जप्त
अडीच लाखांची दारु जप्त

अडीच लाखांची दारु जप्त

sakal_logo
By

58098
गडहिंग्लज : जप्त केलेल्या मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी.
------------------------------

अडीच लाखांची दारू जप्त

‘उत्पादन शुल्क’ची गडहिंग्लज परिसरात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच ठिकाणी कारवाई करीत दोन लाख ५९ हजार ४४० रुपयांची गोवा बनावटीची व गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच एक दुचाकीही जप्त केली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. सावित्री तुकाराम गोंदकर (रा. नागणवाडी, ता. चंदगड), दिलीप मयेकर (रा. पार्ले, ता. चंदगड), सचिन नाईक (रा. बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज) अशी संशयितांची नावे आहेत.
उत्पादन शुल्क विभागातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून होणारी मद्याची वाहतूक रोखण्यासाठी छापे टाकले जात आहेत. देवकेवाडी (ता. भुदरगड), नागनवाडी, हलकर्णी, पार्ले (ता. चंदगड) व बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) या ठिकाणी गोवा बनावटीच्या व गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा केला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकले. यात गोवा बनावटीच्या मद्याचे ३८ बॉक्स व ३३०० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. दोन लाख ५९ हजार ४४० रुपयांचा हा मुद्देमाल आहे, तर ७० हजार रुपये किमतीची एक दुचाकीही जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, एल. एन. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, जवान बी. ए. सावंत, एस. बी. चौगुले, जी. एस. जाधव, वाहनचालक ए. टी. थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.