यिन फराळ आणि चादर वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन फराळ आणि चादर वाटप
यिन फराळ आणि चादर वाटप

यिन फराळ आणि चादर वाटप

sakal_logo
By

लोगो - यिन
58156
कोल्हापूर : ‘सकाळ’ यिनच्या सदस्यांनी शहरात ठिकठिकाणी फिरस्ते, निराधार यांना चादर आणि फराळाच्या पाकिटाचे वाटप केले. या वेळी त्यांनी अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली.

वंचित बांधवांची दिवाळी झाली गोड
‘सकाळ- यिन’च्या पुढाकारातून फराळ पाकिटे, चादरींचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : समाजातील वंचितांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यिन व्यासपीठातर्फे आज फराळ व चादर वाटप करण्यात आले. रेल्वे फाटक, एस. टी. स्टँड परिसर, वटेश्‍वर मंदिर, शनी मंदिर, अंबाबाई मंदिर परिसर आणि महाद्वार रोड परिसरातील गरजू व्यक्तींना फराळासह चादरीचे वाटप करण्यात आले.
‘सकाळ’च्या शहर कार्यालयात या उपक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर ‘यिन’च्या कोअर टिममधील सर्व सदस्यांनी शहरातील विविध ठिकाणी फराळाच्या पाकिटांचे व चादरीचे वाटप केले. गरजू व्यक्तींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या व्यथा ‘यिन’च्या सदस्यांनी जाणून घेतल्या.
गेल्या चार-पाच दिवसांत ‘सकाळ’ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तसेच यिनच्या सदस्यांनी फराळाचे संकलन केले. त्यानंतर आज ‘यिन’च्या सदस्यांनी त्याचे योग्य वर्गीकरण करून पॅकिंग केले. कागदी पिशव्यांमध्ये हा फराळ भरून कापडी पिशव्यांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविला. या वेळी राजलक्ष्मी कदम, सई साळोखे, आदिती पवार, पौर्णिमा सूर्यवंशी, पराग हिर्डेकर, मुग्धा कुलकर्णी, ओंकार रसाळ, श्रेया चौगले, तिर्था मोळे, संकेत पवार, दुर्वा सावंत, आफरीन नदाफ, मधुरा पाटील, योगेश पोतदार उपस्थित होते. ‘यिन’चे सहायक व्यवस्थापक अवधुत गायकवाड यांनी संयोजन केले.