आजरा ः मधमाशांच्या हल्यात शेतकरी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः मधमाशांच्या हल्यात शेतकरी ठार
आजरा ः मधमाशांच्या हल्यात शेतकरी ठार

आजरा ः मधमाशांच्या हल्यात शेतकरी ठार

sakal_logo
By

58155 नानू कोकीतकर
........

मधमाश्‍यांच्या हल्ल्यात
मेंढोलीत शेतकरी ठार

आजरा, ता. २२ ः मेंढोली (ता. आजरा) येथील नानू जोतिबा कोकीतकर (वय ७५) हे मधमाश्‍यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झाले. शुक्रवारी (ता. २१) शेळ्या चारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मधमाश्‍यांचा हल्ला झाला होता. त्यांचा शोध घेतल्यावर आज सकाळी त्यांचा मृतदेह सकाळी साडेनऊ वाजता मिळून आला. मधमाश्‍यांच्या हल्ल्यात सहा शेळ्याही जखमी झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोकीतकर हे नेहमीप्रमाणे सायंकाळी ‘काळवाट’ नावाच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. शुक्रवारचे ते घरी येत नाहीत, ते शेतातच मुक्काम करतात. शेतातून आज सकाळी ते घरी न परतल्यामुळे घरातील मंडळी व नातेवाइकांनी शोधाशोध केली असता मेंढोलीच्या गायरानाजवळील सोनाबाई पाटील यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाश्‍या घोंगावत होत्या. तसेच काजूच्या झाडावर मधमाश्‍यांचे पोळे आढळले. दिवाळी सणादिवशीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा केंद्रीय राखीव पोलिस दलात, तर दुसरा शेतकरी आहे.