रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

५८१४७
गोविंदराव टेंबे
यांचे रुबाबदार शिल्प
कला आणि संस्कृती गाजवणाऱ्या थोर विभूतींची गौरव करण्याची परंपरा असणाऱ्या कोल्हापुरात विविध क्षेत्रांतील दिग्गजांची स्मारकशिल्पे स्थापित आहेत. उच्च कला, अभिरुचीची दखल घेताना कोल्हापूरकरांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचा राजारामपुरी येथील राजाराम गार्डनमध्ये पुतळा स्थापित केला आहे. निष्णात हार्मोनियम वादक, कवी, लेखक, नाटककार अशा या थोर भारतीय कीर्तीच्या संगीत दिग्दर्शकाच्या स्मारक शिल्पाचे पेडस्टल काळ्या पाषाणातील असून नजाकतपूर्ण ठरावे, अशा बाह्यरेषेच्या तपशिलाचे आहे. त्यावर श्‍वेत संगमरवराचा शीलाफलक जोडला असून, या पेडेस्टलला शोभून दिसेल अशा तपशिलाचा जोड असणारा कास्य धातूमधील या अर्ध पुतळ्याची बैठक आहे.
पाश्‍चिमात्य पद्धतीच्या पोषाखातील तपशिलामध्ये रुंद कॉलरचा कोट, आतमध्ये गळ्यापर्यंत बटन लावलेला शर्ट असून, मध्यम उठावात चेहऱ्यावरील तपशील साकारताना वास्तववादी पद्धतीने हाताळणी जपली आहे. वृद्धत्वाकडे झुकणारा तरी अत्यंत भावदर्शी आणि करारी नजर त्यास अनुसरून भुवयामधील उठाव, कानाच्या बाजूला असणारे केस, भव्य कपाळ, उठावदार नाक, आत्ताच बोलतील असे वाटणाऱ्या ओठांवर दर्शवलेल्या बारीक तरी तलवारीप्रमाणे असणाऱ्या मिशा हे या पुतळ्याचे वैशिष्ट्य आहे. शिल्पकार (कै) शामराव डोंगरसाने यांनी हे शिल्प साकारले असून त्याचे अनावरण वीस ऑक्टोबर १९५६ रोजी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या हस्ते झाले.