तोडणी मजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोडणी मजूर
तोडणी मजूर

तोडणी मजूर

sakal_logo
By

फोटो- बी. डी. चेचर देतील

ऊस तोड मजुरांचा संसार चिखलात
...............
पावसामुळे हाल ः बहुंताशी कारखाना परिसरातील चित्र
.....................
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ऊस तोडणीसाठी कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या तोडणी मजुरांचा संसार चिखलातच राहिला. या पावसामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले. दोन दिवसांपूर्वीच उभारलेल्या झोपडीत पाणी साचून तळे झाले आहे. जिल्ह्यातील बहुंताशी कारखाना कार्यस्थळावर हे चित्र आज पहायला मिळाले.
राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. पण गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे प्रत्यक्ष ऊस तोडणी सुरू नाही. सर्वच कारखान्यांनी सभारंभपूर्वक हंगामाला सुरूवात केली, पण गाळपासाठी आवश्‍यक ऊस आणणे कारखान्यांसमोर आव्हान बनले आहे. एकीकडे कारखान्याला ऊस मिळेना आणि दुसरीकडे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांना पावसामुळे आपला आसराही उभा करता येईना अशी स्थिती आहे. ज्या परिसरात तोडणी मजूर दाखल झाले, त्याठिकाणी कालच्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.
पावसामुळे हंगाम लांबण्याची शक्यता असल्याने तोडणी यंत्रणाही अजून पूर्ण क्षमतेने दाखल झालेली नाही. बीड, उस्मानाबाद, लातूर या परिसरातून केवळ ४० ते ५० टक्के यंत्रणा दाखल झाली. कारखाना परिसरातच असलेल्या गाडी अड्ड्यात ही कुटुंबे छोट्याशा झोपडीत आपला संसार थाटतात. पण कालच्या धुवाँधार पावसाने या झोपडीतच चिखल झाला, त्यामुळे अनेकांना दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेण्याची वेळ आली. सोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घेताना तर त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. दोन दिवसांपूर्वी पावसाची उघडीप असल्यामुळे उभारलेल्या झोपड्या आज चिखलातच असल्याचे दिसले. या झोपड्यांची स्वच्छता करण्यातच आजचा तोडणी मजुरांचा दिवस गेला.
............