गुणीदास फाऊंडेशनतर्फे रंगली दिवाळी पहाट मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणीदास फाऊंडेशनतर्फे रंगली दिवाळी पहाट मैफल
गुणीदास फाऊंडेशनतर्फे रंगली दिवाळी पहाट मैफल

गुणीदास फाऊंडेशनतर्फे रंगली दिवाळी पहाट मैफल

sakal_logo
By

५८१४९
गुणीदास फाउंडेशनतर्फे
रंगली दिवाळी पहाट मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : ‘‘माय भवानी...‘, ‘इंद्रायणी काठी...‘, ‘हे शाम सुंदर...'', ‘मी राधिका...’ अशा विविध गीतांनी आज गुणीदास फाउंडेशनची दिवाळी पहाट मैफल रंगली. रात्री झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर रंगलेली ही मैफल अविस्मरणीय ठरली.
पुण्यातील प्रसिद्ध गायक रश्मी मोघे, राहुल जोशी, श्रुती देवस्थळे यांचा स्वराभिषेक होता. ‘तू सप्तसूर माझे...‘, ‘जीव रंगला दंगला..‘, ‘केंव्हा तरी पहाटे...’, ‘दूर हा किनारा...’, ‘पांडुरंग नामी...’ ‘गण राजाला मनी पूजला...’, ‘मुरलीधर श्याम...’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला...’,‘कळीदार कपोरी पान...’
‘माघाची थंडी माघाची...’ आदी एकाहून एक सरस गीते मैफलीत सादर झाली. अंबाबाईच्या गोंधळाने मैफलीची सांगता झाली. अमृता केदार (की बोर्ड), प्रसन्न बाम (हार्मोनियम), सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (व्हायोलिन), राजू जावळकर (तबला), अजय अत्रे (तालवाद्य) यांची साथसंगत होती. सोनाली श्रीखंडे यांनी निवेदन केले. प्रसाद कामत, राजेश काजवे, संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार झाले. फाउंडेशनतर्फे अध्यक्ष शिरीष सप्रे, उपाध्यक्ष दिलीप बनछोडे, राजप्रसाद धर्माधिकारी, डॉ. अजित शुक्ल, दर्शन शिपूरकर, अरविंद लाटकर, अमित कुलकर्णी, प्रदीप मोघे आदी उपस्थित होते.