आधार फौंडेशनतर्फे तेल वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार फौंडेशनतर्फे तेल वितरण
आधार फौंडेशनतर्फे तेल वितरण

आधार फौंडेशनतर्फे तेल वितरण

sakal_logo
By

आधार फौंडेशनतर्फे तेल वितरण
गडहिंग्लज : दिवाळीनिमित्त आधार फौंडेशनच्या वतीने शहरातील गरजू १६० नागरिकांना खाद्य तेलाचे वितरण केले. अध्यक्ष सतीश हळदकर, धनंजय कळेकर, युवराज पाटील, किरण भोसले, विरू चौगुले, श्री. गरुड, संग्राम पावले, प्रकाश बागी, अभिजित गवळी, अरुण कलाल, एन. आर. पाटील, सूरज शिंदे, श्रीकांत मोहिते, नितीन निकम यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला.
----------------------------------------

गडहिंग्लज प्रशालेत बुद्धिमत्ता मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन केले. संभाजी पाटील यांनी गडहिंग्लजसह कडगाव, हसूरचंपू, मुगळी, नेसरी, भावेश्‍वरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य पंडित पाटील यांचे भाषण झाले. विद्यार्थ्यांसह तानाजी पाटील, अजित पाटील, सुरेश कुंभार आदी उपस्थित होते.
---------------------------------------------

गडहिंग्लज हायस्कूलमध्ये साळुंखे स्मृतिदिन
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचा स्मृतिदिन साजरा केला. मोहन कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापक पंडित पाटील, वैजनाथ पालेकर, देवानंद कांबळे, आप्पासाहेब शिंदे, महादेव मन्नोळे, रवी कांबळे, चंद्रकांत कुंभार आदी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी साळुंखे यांचा जीवनपट सांगितला. श्री. पालेकर यांनी भाषण केले. श्री. पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत कुंभार यांनी आभार मानले.
----------------------------------------------
महागाईला आवर घालण्याची मागणी
गडहिंग्लज : केंद्र सरकारने महागाईला आवर घालावा, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे केली. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महागाईने जनता भरडत आहे. त्याचे काहीच देणे-घेणे सरकारला दिसत नाही. हे दुर्दैव आहे. सरकारने शंभर रुपयात सामान्यांना दिवाळी किट देण्याची घोषणा केली, परंतु दिवाळी आली तरी त्याचा पत्ता नाही. हे किट मोफत देऊन सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची गरज होती. सरकारने तसे केले असते तर लोकांना दिलासा मिळाला असता. सरकारला सामान्य माणसांची चिंता नसून केवळ खुर्ची टिकवण्यासाठीच त्यांची धडपड सुरु असल्याची टीकाही प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.